स्वच्छ भारत मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे:उपायुक्त दीपक झिंजाड
भिवंडी: स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार भिवंडी महानगरपालिकेत स्वच्छता पंधरवडा आयोजन दिनांक पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. स्वच्छ भारत उपक्रमाची सुरुवात पालिकेत शुक्रवारी प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सर्व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आली होती. आज रविवार दिनांक 17 पासून करण्यात प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाला सुरूवात करण्यात आली.भिवंडी शहराचे श्रद्धास्थान असणाऱ्या वराळदेवी तलाव परिसराची येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

वराळदेवी मंगल भवन येथे मुख्य कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी सर्व कर्मचारी वर्गाला स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत सोनावणे, सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे, फैसल तातली, राजेंद्र वरळीकर, नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, उद्यान विभाग प्रमुख निलेश संखे, समाज कल्याण विभाग प्रमुख स्नेहल पुण्यार्थि , भविष्य निर्वाह विभाग प्रमुख श्रीकांत परदेशी, परवाना विभाग प्रमुख प्रकाश राठोड, आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी अन्य आरोग्य अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत, प्लास्टिक पिशव्या यांचा वापर करू नये या विषयावरील पथनाट्य सादर केली. या प्रसंगी उपायुक्त दीपक झिंजाड यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, आपल घर व परिसर स्वच्छ असेल तर आपोआपच शहर देखील स्वच्छ होईल. कचरा टाकताना घंटा गाडीचा वापर करावा, अन्यत्र रस्त्यावर कचरा टाकू नये. प्लास्टिकचा वापर टाळावा, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियानाचे दोन भाग असून पहिला भाग हा इंडियन स्वच्छता लीग, इंडियन स्वच्छता लीग म्हणजे पालिका आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून स्वच्छ भारत अंत्तर्गत सर्व उपक्रम राबवणे व दुसरा भाग हा सफाई मित्र यांच्या करता आहे. स्वच्छ भारत उपक्रमात प्रामुख्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे, ओला कचरा , सुका कचरा वर्गीकरण याची जनजागृती करणे, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवणे अपेक्षित आहे. वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता ठेवून शहराचे आरोग्य आरोग्य उत्तम ठेवणे, साथीचे रोगाला, आजाराला दूर ठेवणे अपेक्षित आहे. या उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन भिवंडी शहर स्वच्छ ठेवणे कामी सहकार्य करावे असे आवाहन देखील पालिका उपायुक्त दीपक झिंजाड यांनी केले. स्वच्छ भारत सर्वेक्षणाचा भाग म्हणून भाग म्हणून वृक्षारोपण देखील करण्यात आले. या उपक्रमाला जोडून केंद्र शासनाचा मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश उपक्रम घेण्यात आला. *अमृत कलश यात्रा* म्हणजे घरोघरी जाऊन माती संकलन हा देखील उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी सर्व स्वातंत्र्यवीर, शहीद जवान, यांना अभिवान करून, अमृत कलश यात्रा उपक्रमाची माहिती देण्यात आली. आपल्या गावातील मातीशी नाळ जोडलेली असते यातून राष्ट्रीय एकात्मता साधणे, ही जमा झालेली माती ही जमा झालेली माती राजधानी दिल्ली येथे तयार होणाऱ्या अमृत वाटिकेकरता वापरण्यात येणार आहे.या उपक्रमात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी कामतघर परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन माती संकलन केले.या वेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली.