भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळविण्यात येते की, स्टेम वॉटर डिस्ट्र कंपनी यांच्याकडून मुख्य उद्दंचन केंद्र शहाड येथील नवीन एक्सप्रेस फिडर कार्यान्वित करण्याकरता व इतर देखभाल दुरुस्तीच्या कामा करता शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी नऊ वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 9 सप्टेंबर सकाळी नऊ वाजेपर्यंत 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडी शहरासाठी स्टेम मार्फत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे व पुढील एक दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी केले आहे.
