भिवंडी: महानगरपालिका सेवेच्या नियमानुसार नियत वयोमानाप्रमाणे व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम, १९८२ चे कलम १० (१) प्रमाणे ३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार व त्यांचे अध्यक्षतेखाली महानगरपालिकेतर्फे कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी १) नारायण दगडु तांबे, (लिपीक), २) आदिल गुलाम मुस्तफ़ा पावले (लिपीक), ३) सुरेखा पांडुरंग साळवे (सफाई कामगार) या तिन कर्मचा-यांना निरोप देणेत आला. याप्रसंगी मनपाचे सहा- आयुक्त (प्रशासन) बाळाराम जाधव यांच्या उपस्थितीमध्ये भविष्य निर्वाह निधीचा धनादेशाचे पत्र शाल व चेके देऊन यथोचित सत्कार करण्यांत आला.
महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकिय इमारतीच्या तिस-या मजल्यावरील मा. आयुक्त साहेब यंचे कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न झाला. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमध्ये १) नारायण दगडु तांबे, (लिपीक), २) आदिल गुलाम मुस्तफा पावले (लिपीक), ३) सुरेखा पांडुरंग साळवे (सफाई कामगार) या सेवानिवृत्त कर्मचारीयांना महानगरपालिकेच्यावतीने आज निरोप देण्यांत आला. याप्रसंगी महानगरपालिकेचे सहा आयुक्त (प्रशासन) बाळाराम जाधव, युनियमचे पदाधीकारी, इतर मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
