भिवंडीतील ५ केमिकल तस्करांना गुन्हे शाखेने आंतरराज्यासह बाह्यराज्यातून ठोकल्या बेड्या २ टेम्पोसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी


भिवंडी: नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ च्या पोलीस पथकाने समांतर तपास करीत केमिकलच्या १४ लाखांच्या मालासह २ टेम्पो जप्त करून ५ जणांना आंतरराज्यासह बाह्य राज्यातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.दुर्गेश सबरजीत भारती (२४),राहुल गिरीजा सरोज (२७ दोघेही मूळ रा.उत्तर प्रदेश),उमेश दत्तात्रेय पाटील (२४),अमरदीप विलास बिराजदार (२४ दोघेही मूळ रा.उस्मानाबाद),श्रीकांत गणपत देसाई (३० मूळ रा.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या केमिकल तस्करांची नावे आहेत.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील पूर्णा येथील द्रौपदी छाया कंपाउंड मधील ओमकार वेअर हाऊसमध्ये ५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२३ दरम्यान गाळ्याच्या शटरचे कुलूप तोडून १४ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचा कास्टिक सोडा आणि मोनोसोडीअम ग्लुकोमेट केमिकलच्या मालाची चोरून नेल्याने याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुषंगाने गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय मोरे,प्रफुल जाधव,धनराज केदार,पोऊनि हनुमंत वाघमारे,रामसिंग चव्हाण,सपोउनि रविंद्र पाटील,रामचंद्र जाधव,राजेश शिंदे पोह सुनिल साळुंके,सचिन साळवी,मंगेश शिर्के,रंगनाथ पाटील,साबीर शेख,देवानंद पाटील,प्रकाश पाटील,किशोर थोरात,शशिकांत यादव,पोना सचिन जाधव,पोशि भावेश घरत,सचिन सोनवणे,जालिंदर साळुंखे,रोशन जाधव,प्रशांत बर्वे,मपोह माया डोंगरे,श्रेया खताळ आदी पोलीस पथक तपास करीत होते.दरम्यान केमिकल तस्कर चोरटे हे मूळचे उत्तरप्रदेश व सातारा येथील असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाचे दोन तुकड्यांमध्ये विभाजन करून अनुक्रमे उत्तरप्रदेश व पाठण,सातारा येथे रवाना करण्यात आले होते.त्यावेळी दुर्गेश भारती यास उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातून तर राहुल सरोज यास आझमगडमधून बेड्या ठोकल्या आहेत.तर श्रीकांत देसाईला साताऱ्यातील पाठण तालुक्यातून अटक केली आहे.त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता,या केमिकल तस्करीत मूळचे उस्मानाबादातील उमेश व अमरदीप यांचाही सहभाग असल्याचे समोर आले.आरोपीत सर्वजन भिवंडीतील वेगवेगळ्या भागात राहून संगनमताने भिवंडीतून चोरी केलेल्या केमिकल मालाची बाह्यराज्यात विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे.त्यांच्याकडून एकूण १४ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचा कास्टिक सोडा प्लॅक्स व ग्लुकोमेट केमिकल मालासह २४ लाख रुपये किमतीचे २ टाटा टेम्पो असा एकूण ३८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वरील ५ केमिकल तस्करांना २२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास गुन्हे शाखेचे सपोनि धनराज केदार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *