भिवंडी : २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्त बुधवार रोजी संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक कल्याण विभाग यांच्या सूचनेनुसार शहरातील सोशल वेलफेअर फाऊंडेशन (भिवंडी वॉरियर्स) आणि सैनिक फेडरेशन,ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली वाहण्यात आली.या निमित्ताने शहरातील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळील हुतात्मा स्मारकाजवळ शहीदांना अभिवादन करण्यात आले.भिवंडी वॉरियर्स संघ आणि वॉरियर्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजयाच्या स्मृती जागवीत शहरातील कामतघर येथील मोतीराम काटेकर मैदानावर पवित्र वरलादेवी तलावाच्या काठावर वृक्षारोपण केले. यावेळी माजी कारगिल हिरो पॅरा स्पेशल फोर्स कमांडो अनिल सुर्वे, माजी सैनिक जगदीश पाटील, माजी सैनिक नीलेश केणे आणि भिवंडी वॉरियर्स टीम, निवृत्त सैनिक फुलसिंग आर्मी यांच्यासह प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शहीदांचे स्मरण करीत त्यांना आदरांजली वाहिली.
