भिवंडी : भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ ने मोठ्या शिताफीने तपास करून दोन गुन्ह्यांच्या उकळीत ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून भिवंडीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.साकीब उर्फ सलमान मोहमद अख्तर अंसारी (२४),अजय यजुभाई वाघेला (२३ दोघेही रा.भिवंडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीतांची नावे आहेत.दरम्यान गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,पहिल्या घटनेत घोडेखात आळी, कल्याण येथील श्रीदक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या बाहेरील जाळीतून मंदिराच्या गाभाऱ्यातील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने २४ ते २५ रोजी दरम्यान मंदिरातील सव्वा किलो वजनाची चांदीची गदा तसेच चांदीचा मुकुट, चांदीचे छत्र, चांदीचा रुईचे पानांचा हार, पितळी टोला, टाळ, दान पेटीतील रक्कम, एलईडी टी.व्ही, डीव्हीआर चोरून नेला होता.याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता.दरम्यान गुप्त बातमी दारामार्फत साकीब उर्फ सलमान अन्सारी यास २४ तासांच्या आतच ताब्यात घेवून त्याच्याकडून ६ हजार ४७० रुपयांची रोख रक्कमेसह मंदिरातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर दुसऱ्या घटनेत ठाणे पोलीस आयुक्तालयातील चोरीस गेलेले व गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपन्यांचे ५ लाख ७९ हजार रुपयांचे ४२ मोबाईल हस्तगत करण्यात येवून मोबाईल धारकांना वाटप करण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे तिसऱ्या घटनेत २ ते ३ जुलै दरम्यान सोन्याच्या बनावट १० माला विकून हिना खान या महिलेची १ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याचा गुप्त बातमी दारामार्फत शोध घेऊन गुन्हे शाखेने त्यास बेड्या ठोकून अधिक चौकशीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सदरची कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक -२ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड,पोनि विजय मोरे, सपोनि प्रफुल्ल जाधव, सपोनि धनराज केदार,पोउनि हनुमंत वाघमारे,रविंद्र पाटील, पोह सचिन साळवी,मंगेश शिर्के,पोना सचिन जाधव, पोशि जाधव,प्रशांत बर्वे,भावेश घरत,अमोल इंगळे,रविंद्र साळुंखे, मपोह माया डोंगरे,श्रेया खताळ या गुन्हे शाखा पोलीस पथकाने केली आहे.