भिवंडी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या शासनाच्या उप सचिव मा. प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून केलेल्या नियुक्तीमुळे भिवंडी महापालिकेच्या रिक्त झालेल्या प्रशासक तथा आयुक्त पदी नियुक्त राज्य कर सह आयुक्त अजय वैद्य यांनी कामावर रुजू होऊन येथील पदभार स्विकारल्यामुळे महापालिका उप-आयुक्त (आरोग्य / कर) दीपक झिंजाड यांनी महापालिकेच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यांत आले.
नवीन प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी यावेळी सांगितले की, भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार असून, येथील अडचणी सोडविण्यास मी कटिबध्द राहणार आहे आणि यासाठी त्यांनी कामावर रुजू झाल्यानंतर महापालिकेच्या सर्व विभागांचा आढावा घेऊन, मुलभूत सुविधा, शहरातील प्रमुख समस्या सोडविसाठी आणि विकासासाठी प्राधान्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आयुक्त अजय वैद्य यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, सहा. संचालक नगररचना अनिल येलमामे, सहा. संचालक नगररचना (विकास घटक योजना) स्मिता कलकुटकी मुख्य लेखा व वित्त अधिकारी किरण तायडे, जनसंपर्क अधिकारी सुनिल झळके, उपअभियंता एस.जी. भट, सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, नंदकुमार चौधरी, राजू वरळीकर, विविध विभागाचे अभियंता इ. अधिकारी वर्ग उपस्थित होते.
