भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर उद्दीष्ट पूर्तीसाठीचा निर्णय ,कर वसुलीसाठी दोन हजारांच्या नोटांचा अमर्यादपणे स्विकार करणार

भिवंडी

भिवंडी:केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेत केवळ १० नोटाच स्विकारल्या जातील, असेही स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेनेही जितक्या नोटा असतील त्या सर्व स्विकारण्याची तयारी दर्शविलेली आहे. या संधीचे चीज करण्यासाठी महापालिकेनेही करबुडव्यांकडून एकत्रितपणे थकीत रक्कम मिळावी पासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा अमर्यादपणे स्विकारण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मालमता करावरील टप्प्याटप्प्यातील दिलेल्या सूटीमुळे ऑगस्ट अखेर महापालिका तिजोरीत अधिक कोटीचा भरणा होणार असल्याचे अपेक्षित आहे.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील करबुडव्यांवर मागील वर्षाची ७०७ कोटी इतकी थकबाकी आहे. ही थकबाकीची रक्कम वसुल करण्यासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील मालमत्ता विभागाने १५ जुन २०२३ पर्यंत संपूर्ण रक्कम भरल्यास ५%, १६ जुन ते ३० जुन २०२३ पर्यंत संपूर्ण कराची रक्कम भरल्यास ४%, १ जुलै ते ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण कराची रक्कम भरल्यास ३% आणि १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत संपूर्ण कराची रक्कम भरल्यास २% अशा चार टप्प्यांमध्ये करदात्यांना, करबुडव्यांना सुट देण्याचे महापालिकेच्यावतीने निर्णय घेऊन जाहीर केले आहे तसेच केंद्र सरकारने दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशानुसार बँकेमध्ये दोन हजाराच्या केवळ १० नोटाच स्विकारल्या जातील अशा स्पष्टपणे सुचना दिलेल्या आहेत या अनुषंगाने महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या करबुडव्यांना आणखी एक विशेष संधी यानिमित्त देण्यांत आलेली आहे की, थकीत मालमत्ता कर असलेल्या करदात्यांनी त्यांच्या थकीत मालमत्ता कराच्या बदल्यांत महापालिका आता दोन हजार रुपयांच्या नोटा अमर्यादित, अनलिमिटेड स्वरूपांत भरल्यास त्यांचा महापालिकेमध्ये स्विकार करण्यात येणार आहे, अशी माहिती मालमत्ता कर विभागाचे उप आयुक्त कर दीपक झिंजाड यांनी दिली आहे.

मालमत्ता कराची २०२३ २०२४ या चालू वर्षातील मागणी देयकांच्या छपाईचे काम सुरु असून लवकरच त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. भिवंडी महापालिकेने यापूर्वी जवळ-जवळ सात ते आठ वेळेस अभय योजना लागू केलेली होती परंतू मालमत्ताधरकांकडून हवा तितका प्रतिसाद मिळत नसल्याने मालमत्ता कराच्या थकबाकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिकेने दिलेल्या या सुटीचा फायद्यासह दोन हजारांच्या नोटा भरण्याच्या या दोन्ही सुवर्ण संधीचा लाभ घेतल्यास थकबाकी धारकांची जप्तीसारख्या कारवाईची डोकेदुखी थांबणार आहे आणि महापालिकेच्या ऊपन्नांतही अधिक प्रमाणांत भर पडेल.

त्यामुळे महापालिकेने यावेळेस नागरीकांनी माहे जून ते ऑगस्ट २०२३ च्या अखेरपर्यंत आपल्या थकीत मालमत्ता कराची रक्कम एकत्रितपणे संबंधित प्रभाग समितीमध्ये विहीत मुदतीत भरणा करावी किंवा महापालिकेने खास कर भरण्यासाठी ऊपलब्ध करुन दिलेल्या https://propertytax.bhiwandicorporation.in या वेबसाईडचा वापर करावा आणि आपला थकीत मालमत्ता कराची रक्कम महापालिकेत अधिक प्रमाणांत जमा करुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आणि महापालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांना थकबाकीची रक्कम अधिकाधिक प्रमाणांत वसुल होण्याकामी आवाहन करण्यांत आलेले असून, महापालिका चलनातून मागे घेण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचा स्विकार अमर्यादपणे करण्यार असल्याचे व महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यांत आलेल्या या दोन्ही सुवर्णसंधीचा फायदा नागरीकांनी घ्यावा असेही शेवटी सांगितले आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे ऑगस्टच्या अखेरीस पालिकेच्या तिजोरीमध्ये नागरीकांनी अधिकाधिक कोटींचा भरणा करणे अपेक्षित आहे.

रिबेट (सूट) तक्ता :- खालील कालावधीत संपूर्ण थकबाकी सह दुसऱ्या सहामाहीचे बिल भरल्यास दर्शविलेल्या दराने सूट मिळेल.
१) दिनांक 15 जून पर्यंत भरल्यास ५ टक्के सूट
(२) दि. १६ जुन ३० जूनपर्यंत
४ टक्के सूट.

३) दि. १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत
३ टक्के सूट.
४) दि.१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
पर्यंत २ टक्के सूट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *