भिवंडी:उप-आयुक्त दिपक झिंजाड यांनी महानगरपालिकेच्या काही विभागांमध्ये अचानक भेट दिल्याने कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडाली

भिवंडी


उपआयुक्तांची मनपा विभागांना अचानक भेट, लेट लतीफ, वेळे अगोदर जाणा-या कर्मचा-यांवर संक्रांत.

भिवंडी: (प्रेस नोट) कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा असल्याने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६.१५ ही वेळ असतांना मनपा कार्यालयामध्ये उशिरा येणारे व कामाच्या वेळेपूर्वी जाणारे मनपा कर्मचारी बेजबाबदारपणे वर्तन करीत असल्याचे आणि तशा नागरीकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार उप-आयुक्त (मुख्यालय) दिपक झिंजाड यांनी आज महानगरपालिकेच्या काही विभागांमध्ये अचानक भेट दिल्याने अशा कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेप्रमाणे कर्मचा-यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये आपआपली कर्तव्य आणि जबाबदारी व्यवस्थितरित्या पाळून कार्यालयीन शिस्त लावण्याच्या उद्देशाने ही अचानक भेट उप- आयुक्त झिंजाड यांनी दिली.

या भेटी दरम्यान गैरहजर कर्मचारी ९ कामाच्या वेळेपूर्वी लवकर गेलेले कर्मचारी ४ असे एकूण १३ कर्मचारी या भेटीच्या चक्रव्युहामध्ये सापडल्याचे कळले आहे. या वृत्ती व मानसिकतेवर अंकुश आणण्यासाठी आता लवकरच बायोमेट्रीक प्रणाली जी पे रोलला कनेक्टेड असणार आहे अशा प्रणालीचा वापर करण्यांत येणार असून, त्याव्दारे पगार दिला जाणार असल्याची माहिती उप-आयुक्त झिंजाड यांनी दिली. तसेच त्यांनी पुढे असेही म्हटले की, आता दररोज सकाळी आणि सायंकाळी कामावर येण्या-जाण्याच्या वेळेवर तपासणीकामी भरारी पथकाची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले त्यामुळे अशा कर्मचा-यांवर निर्बंध आणणे किंवा कारवाई करणे निश्चितच सोपे होईल आणि सर्व विभागांना नियमानुसार करमचा-यांसाठी कर्मचा-यांचे कामानिमित्त येण्या- जाण्यासाठीचे आगमन-निर्गमन रजिस्टरही ठेवण्याचे निर्देश दिलेले असल्याने बेजवाबदार कर्मचा-याची नक्कीच कोडी होणार आहे त्यासाठी मनपा आता अॅक्शन मेडवर आली असल्याचे निदर्शनास येते. यावेळी ज्या कर्मचा-यांनी हजेरी मस्टरवर सह्या केलेल्या नाहीत अशा कर्मचा-यांनाही आता उप-आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे धडकी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *