आमदार रईस शेख यांनी एका अड्ड्यावर अचानक धाड टाकून जुगारी व माफियांना रंगेहाथ पकडले. पोलिसांना जे जमले नाही, ते आमदारांनी करून दाखविले, अशी परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वस्त्या आहेत. या वस्त्यात लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहतात. या कामगार वर्गात अनेकांना दारूचे व्यसन आणि मटका, जुगाराचा नाद आहे. यामुळे वस्त्या वस्त्यात ठिकठिकाणी जुगार मटक्याचे अड्ड्यासह विविध प्रकारचे गोरखधंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी समोर येतात. नेहमीच विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. अशीच एक तक्रार भिवंडीतील समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्याकडे करण्यात आली होती. त्यातच आमदार शेख यांचा महापालिका अधिकाऱ्यासह नालेसफाईचा पाहणी दौरा २३ मे रोजी होता.
आमदारांच्या छापेमारीनंतर पोलिसांची कारवाई-काही वेळातच पोलीस जुगार अड्ड्यावर दाखल झाले. त्यांनी जुगार माफिया अहमदअली उस्मान कारभारी (वय ५२, रा. तोफानाका, भिवंडी) निहाल अहमद अब्दुल मजीद मोमीन ( वय ५९, रा. शांतीनगर, भिवंडी ) अबु सत्तार फतेअहमद शेख (वय ६०, रा. नविवस्ती, भिवंडी ) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जुगार मटक्याच्या अड्ड्यातुन दाणा घोडी, अंदर बहार , काला पिलासह कल्याण मेन मटका जुगाराचे साहित्य आणि ३ हजार ५५० रुपये रोख जप्त केले. या जुगार अड्ड्यावर आमदारांनी धाड टाकल्याने मग शहरातील पोलीस करतात काय ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र बारकु पाटील यांच्या तक्ररीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात जुगार माफिया त्रिकुटावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार अनिल शिरसाठ करीत आहेत.
