भिवंडी परिमंडळ -२ अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांत २०२३ मध्ये नागरीकांच्या मोबाईल गहाळ झाल्याच्या घटनांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात दाखल होत्या.त्याअनुषंगाने गुन्हे शाखा घटक- २ च्या पथकाने भिवंडी शहरात शिताफीने तपास करून ४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे ४५ मोबाईल शोधून गुरुवारी नागरिकांना परत केले आहेत.भिवंडी गुन्हे शाखा युनिट – २ चे अधिकारी व अंमलदारांनी सी.ई. आय.आर प्रणालीचा वापर करून तसेच मोबाईल नंबरचे आय.एम.ई. आय क्रमांकावरून तांत्रिक तपास करून गहाळ मोबाईलचा शोध घेतला.त्यामध्ये एकूण ४५ मोबाईल शोधून ते मोबाईल धारकांना बोलावून त्यांना परत केले आहेत.सदर कामगिरी गुन्हे शाखेचे वपोनि सचिन गायकवाड, सपोनि विजय मोरे,सपोनि धनराज केदार,पोना सचिन जाधव,पोशि भावेश घरत,अमोल इंगळे,मपोना माया डोंगरे,श्रेया खताळ या पोलीस पथकाने केली आहे.बिरो रिपोट अनिल गजरे.