भिवंडी शहराला यावर्षी पुरापासून वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली असून, त्यासाठी महापालिकेने पाच प्रभाग समित्यांमध्ये वेगवेगळ्या ५ कंत्राटदारांसह एकूण ६ ठेकेदारांना २ कोटी ९ लाख २७ हजार १४८ रुपयांचा ठेका दिला आहे.जो मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त म्हणजेच ६० लाखांनी जास्त आहे.इतकेच नाही तर सर्व नाले पूर्णपणे साफ करण्यासाठी आयुक्तांनी ठेकेदारांना ४० दिवसांची मुदत दिली आहे.अशी माहिती आरोग्य अधिकारी जे.एम.सोनवणे यांनी दिली आहे.भिवंडी महापालिकेचे आरोग्य अधिकारी जे.एम.सोनवणे यांनी सांगितले की, महापालिकेच्या पाच प्रभाग समित्यांमध्ये एकूण ९२ लहान-मोठे नाले असून, त्यांचे क्षेत्रफळ ४० हजार ७४७ मीटर आहे.यामध्ये नालेसफाईकरिता ५ प्रभागासाठी प्रत्येकी १ ठेकेदार तर आगरा रोड मुख्य मार्गावर अन्य १ ठेकेदार अशा एकूण सहा कंत्राटदारांना २ कोटी ९ लाख २७ हजार १४८ देण्यात आले आहेत.

दरम्यान या रकमेपैकी ३५ लाख ५० हजार २८९ रुपयांचे कंत्राट उल्हासनगर येथील मेसर्स चंडिका कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे.तसेच प्रभाग समिती २ मधील नाले सफाईचे कंत्राटही याच कंपनीला ३७ लाख ७ हजार ९५३ रुपयांना देण्यात आले आहे.तर उल्हासनगरच्या बुबेरे अँड असोसिएट या कंपनीला प्रभाग समिती तीन अंतर्गत नाले सफाईचे कंत्राट ३७ लाख ५४ हजार १६७ रुपयांना देण्यात आले आहे.प्रभाग समिती क्र. ४ मध्ये चंद्रिका कन्स्ट्रक्शनला ३६ लाख १२ हजार ६ रुपयांचे तर प्रभाग समिती क्रमांक पाचमधील गटार व गटार सफाईचे कंत्राट मेसर्स चंडिका कन्स्ट्रक्शनला ३५ लाख ९ हजार १८६ रुपयांना देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे शहरातील मुख्य मार्ग आग्रा रोडवरील अंजूर फाटा ते नदीनाका या नाल्याच्या सफाईचे २७ लाख ९३ हजार ५४७ रुपयांचे स्वतंत्र कंत्राट मेसर्स चंडिका कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून, यंदा संपूर्ण साफसफाईचे कंत्राट भिवंडीच्या कंपनीला देण्यात आले आहे.या संदर्भात महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सर्व प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांसह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांची नुकतीच संयुक्त बैठक घेतली.

त्यात आयुक्तांनी ४० दिवसांत नाले सफाईचे काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.त्यासाठी त्यांनी अगोदर जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांमधील कचरा साफ करण्याचे आदेश दिले.त्यासोबतच योग्य संख्येने मजुरांची नियुक्ती करून उत्तमरित्या स्वच्छता करण्याचे आदेश दिले.सफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज राहण्याचा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान महापालिकेने ठेकेदारांना अद्याप वर्क ऑर्डर दिली नसल्याने नाल्यांच्या सफाईचे काम ठेकेदारांनी काम सुरू केलेले नाही.मिळालेल्या माहितीनुसार,२६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या भिवंडीत एकूण ९२ नाले आहेत. प्रभाग समिती एकमध्ये २७७७.३० मीटर क्षेत्रफळ असलेले १७ नाले आहेत.प्रभाग समिती दोनमध्ये ९७७०.७० मीटर क्षेत्रफळ असलेले १४ नाले आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये १०७०६ मीटर क्षेत्रफळ असलेले ६ नाले आहेत.तर प्रभाग समिती ४ मध्ये ८२१४ मीटरचे १३ नाले आहेत.त्याचप्रमाणे प्रभाग समिती क्रमांक ५ मध्ये एकूण २२ नाले असून त्यांचे क्षेत्रफळ ४७७९ मीटर क्षेत्रफळ आहे.तर सालाबादप्रमाणे यावर्षीही भिवंडी पाण्याखाली जाणार की यावर्षी महापालिका भिवंडीकरांना पुरापासून वाचवणार ? अशी उलटसुलट चर्चा या नालेसफाईच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील नागरिकांमध्ये सुरू आहे.बिरो रिपोट अनिल गजरे भिवंडी.