भिवंडी | शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ३ अंतर्गत येणाऱ्या नारपोली हद्दीतील आराधना कंपाउंड येथील ऑप. पारसिक बँक जवळील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुर्गंधीने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.या कचऱ्याच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त झाले असून महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे महापालिकेने सदर परिसर स्वच्छ करून या परिसरात कचरा टाकणाऱ्या संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच परिसरात गस्त करून नियमित स्वच्छता ठेवावी अशी मागणी विकी शहा यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान आराधना कंपाउंडच्या गेटच्या बाजूला व मुख्य रस्त्यावरील मोकळ्या जागेत येथील चिकन,मटन, फेरीवाले व स्थानिक रहिवासी कचरा आणून टाकत आहेत.त्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने व्यवसायिकांना व राहिवाश्यांना दुर्गंधीचा सामना लागत असून परिसरात गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे.त्याचप्रमाणे या कचऱ्यामुळे मच्छर,उंदीर,डासांच्या उत्पत्तीने डेंगू,मलेरिया,टायफाईड यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिक ग्रस्त आहेत.त्याकरिता महापालिकेने तात्काळ आराधना कंपाउंड परिसरात स्वच्छता मोहीम राबवून संबंधित कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कारवाई करून परिसरात नियमित स्वच्छता ठेवून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा,अशी मागणी विकी शहा यांनी केली आहे. बिरो रिपोट अनिल गजरे भिवंडी