जव्हार-जितेंद्र मोरघा
येथील रयत शिक्षण संस्थेचे, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक २६ आणि २७ एप्रिल२०२३ रोजी द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनासाठी बेंगलोरहून नॅक कमिटी आली होती. या कमिटीचे चेअरमन डॉ. विजयालक्ष्मी मुव्वा (आचार्य नागार्जुन विद्यापीठ गंटूर, आंध्रप्रदेश) सदस्य, समन्वयक डॉ. बी. एच. सुरेश (म्हैसूर विद्यापीठ ), सदस्य, प्रिं. हौध मोहिद्दीन एम.( हाजी करूथा राउथर हवोदिया कॉलेज उथामापलायन) हे होते. या द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनात महाविद्यालयाला A+(3.43CGPA) श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयात राबविलेल्या बेस्ट प्रॅक्टिस अंतर्गत डिजिटल साक्षरता केंद्र, बायोफ्लोक प्रशिक्षण केंद्र, सायटेक सोयामेट प्रकल्पा अंतर्गत मोखाडा केंद्रातील दहा जिल्हा परिषद शाळांना सोयामिल्क मशीन वाटप करण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकल्पांचे नॅक टीमने कौतुक केले. सायटेक सोयामेट प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आंबेपाणी या शाळेला कमिटीने भेट दिली. त्यावेळी तेथील विद्यार्थ्यांनी केलेला तारपा डान्स बद्दल कमिटीने विशेष कौतुक केले. मोखाडा महाविद्यालयाने मिळविलेल्या उतुंग यशामुळे पालघर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून मोखाड्याची ओळख यापुढे निर्माण होईल.
महाविद्यालयाच्या या यशामध्ये रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ. अनिल पाटील, मा. ॲड. भगीरथ शिंदे (व्हा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था सातारा), मा. रामशेठ ठाकूर ( सदस्य मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था सातारा, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष), डॉ. विठ्ठल शिवणकर (सचिव, र. शि. सं. सातारा), मा. प्राचार्य, शिवलिंग मेणकुदळे (ऑडीटर, र.शि. सं. सातारा) . रोहिदास ठाकूर (विभागीय अधिकारी, रायगड विभाग, र.शि. सं. सातारा), मा. आमदार बाळाराम पाटील ( चेअरमन रायगड विभागीय सल्लागार मंडळ),जेष्ठ पत्रकार मा. मधुकर भावे या सर्वांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने आज महाविद्यालयास A+(3.43CGPA) श्रेणी प्राप्त झाली. या सर्वानी महाविद्यालायचे कौतुक आणि अभिनंदनही केले.
तसेच स्थानिक मान्यवर लोकप्रिय आमदार मा.सुनील भूसारा , जिल्हा परिषद अध्यक्ष मा. प्रकाश निकम, मा.हबीब शेख ( जि. प. सदस्य पालघर), मा. अमोल पाटील (नगराध्यक्ष, नगरपंचायत मोखाडा) तसेच . नरेंद्र पाटील, विलास पाटील आदी मान्यवरांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर व प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन केले.त्याच बरोबर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा देखील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी सत्कार केला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
या द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनासाठी नॅक समन्वयक डॉ. ए. एन. चांदोरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ई.सैंदनशिव, उपप्राचार्य प्रा. मेंगाळ, प्राचार्य डॉ. आर. एस. डुबल, महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव धनगरे सर, अध्यक्ष देविदास पाटील व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नॅककडून A+(with 3.43CGPA) श्रेणी मिळाली.
