जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट- क सरळ सेवा भरती 2023: परीक्षा 7 ऑक्टोंबर पासून सुरू

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट – क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सरळ सेवा भरतीत विविध संवर्गातील एकूण 255 इतक्या पदांची भरती होणार असून उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 7 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती,दालचिनी अतिशय गुणकारी

१) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. २) थंडीमूळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात. ३) जखमा बऱ्या करते : दालचीनी व मध एकत्र करून जिथे जखम झाली आहे तिथे लावल्यास जखम बरी […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेत लोकशाही दिन संपन्न

पुढील लोकशाही दिन ०६ नोव्हेंबर २०२३ त्याकरिता दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत प्रेस रिलिज शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.प्रसुधा२०११प्र.क्र.१८९/११/१८२,दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजीच्या परिपत्रकानुसार महानगरपालिका स्तरावरीत लोकशाही दिन पहिल्या सोमवारी म्हणजेच दि.०३/१०/ २०२३ रोजी सकाळी १०:०० वा. मा. आयुक्त सो यांचे कान्फरन्स हॉल, तिसरा माळा, नवीन प्रशासकिय इमारत, भिवंडी येथे प्रशासक तथा […]

Continue Reading

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना यशवंतराव चव्हाण सभागृहत अभिवादन

*जिल्हा परिषद ठाणे, दि.२ :-* राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री. प्रमोद काळे, बांधकाम विभाग प्रमुख श्री. सुनिल बच्छाव यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Continue Reading

भिवंडीत शहरात स्वच्छता अभियानासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता श्रमदान….

भिवंडी :देशात सर्वत्र 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या दरम्यान स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे.या पंधरवड्याची सांगता १ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण देशभरात ” एक तारीख एक तास ” या कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येत आली. पालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते धामणकर नाका या परिसरात […]

Continue Reading

१ तारीख १ तास महाश्रमदान: स्वच्छता ही सेवा २०२३ उपक्रम

कचरा मुक्त गाव करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी संपूर्ण देशभरात स्वच्छता जनआंदोलन साजरे केले जाते. यावर्षी देखील स्वच्छ भारत २०२३ च्या निमित्ताने दि. १५ सप्टेंबर ते २ […]

Continue Reading

गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुक निमित्ताने वीज वाहिनीचे विघ्न दूर करण्यासाठी टोरेंट पॉवरची कारवाई

भिवंडी :शहरात अनंत चतुर्दशीच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक परंपरागत शहरातील बाजारपेठ मार्गे जात आहे. मात्र या मार्गावर असलेले वीजवाहिन्यांचे जाळे मोठ्या मूर्तीना अडथळे ठरल्याने सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई यांनी टोरेंट पॉवरच्या कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार या कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मिरवणूक मार्गाची पाहणी करून अडथळे दूर करण्याची कारवाई सुरु केली आहे.भिवंडी शहरात […]

Continue Reading

स्वच्छता रन उपक्रमातून स्वच्छतेचा जागर

भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत जुनादुरखी येथे स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन (दि. २४ सप्टेंबर २०२३) रोजी करण्यात आले होते यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छतेची शपथ घेऊन गावातील शाळेतील विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक यांच्या वतीने स्वच्छता स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिवंडी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी श्री. सुधाकर सोनवणे तसेच जुना दुर्खीचे […]

Continue Reading

सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव,कार्यशाळेत ५३० सफाई मित्रांचे आरोग्य तपासणी

ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये ग्रामीण भागातील स्वच्छतेचे काम करणारे सर्व सफाई कर्मचारी यांची तालुका स्तरावर कार्यशाळेत आयोजन करून सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला असून त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली आहे. शासकीय योजनांची माहिती या कार्यशाळेमध्ये देण्यात आले. अंबरनाथ पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक […]

Continue Reading

प्राचार्यांसह शिक्षकांना धमकवल्याप्रकरणी आरपीआय उपाध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी : शिक्षिकेने विद्यार्थ्याला महाविद्यालयात कॉपी करताना पकडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी भिवंडी आरपीआय उपाध्यक्षाने प्राचार्यांसह उपप्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करीत उप प्राचार्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना भिवंडीत घडली आहे.याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून आरपीआय उपाध्यक्षावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दादू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या उपाध्यक्षाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रतिक्षा प्रेमनाथ मिटकर […]

Continue Reading