शांत झोप आणि होमिओपॅथिक उपचार

लेख


झोप आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्‍याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे.  

आपल्या शरीराला व मेंदूलाही विश्रांती मिळावी यासाठी झोप अत्यावश्यक आहे. रात्री पुरेशी झोप झाल्यास शरीर दुसर्‍या दिवशी काम करण्यासाठी ताजेतवाने होते. याशिवाय आपले हृदय, डोळे यांच्यासहित आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही झोप आवश्यक असते. समान्यपणे एका लहान मुलाला 8 ते 10 तासांची झोप आवश्यक असते, तर प्रौढांना 6 ते 7 तासांची झोप पुरेशी असते; पण अलीकडे प्रौढांंमध्ये अतिझोपेचे प्रमाण वाढते आहे.  6 तासांऐवजी 8 ते 10 तास किंवा अनेकजण 11 तासही झोपतात, तर काहीजणांना धड 4 तासांची झोपही मिळत नाही; पण या कमी झोपेचे किंवा अतिझोपेचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात.

झोप न येण्याची कारणे

मेनोपोज

झोप न येण्याची समस्या स्त्री व पुरुष दोघांमध्येही आढळते. मात्र मॅनोपॉजच्या दरम्यान स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण मॅनोपॉजच्या काळात स्त्रीयांमधील अॅस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. झोपेच्या समस्येसोबत काही महीलांचे यामुळे वजन देखील वाढते.

कर्करोग-

कर्करोगाच्या रुग्णांंमध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचारांची कमतरता,पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य ,कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होणे, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. अनेक संशोधनात निरनिराळ्या कर्करोगाचे निदान होण्यापुर्वी ६ महिने व निदान झाल्यावर १८ महिने कमी झोप व थकवा ही लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात.

शहरी  जीवनशैली-

कॉर्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही पहाणे, सकाळी लवकर उठावे लागणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हॉट्सअपवर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते.

गाल ब्लेडर सर्जरी-

गाल ब्लेडर सर्जरी मध्ये पित्ताचे खडे झाल्यास तुमचे गाल ब्लेडर अथवा पित्ताशय काढून टाकण्यात येते. पित्ताशय जड अन्नाच्या पचनासाठी अतिशय उपयुक्त असते.जेव्हा तुम्ही रात्री बराच वेळ उपाशी रहाता तेव्हा पित्ताशय पित्त साठवून ठेवते.पण पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमुळे हा ताण लहान आतड्यावर येतो.त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर ब-याचदा झोपेच्या समस्या निर्माण होतात.

टीथ ग्राईंडींग-

दात कराकरा वाजवण्याच्या समस्येमुळे रात्री तुमची झोपमोड होऊ शकते. ही समस्या ब-याचदा ताण-तणावामुळे होऊ शकते. या समस्येत दातांवर पडणारा दाब इतका असतो की कधीकधी यामुळे दात तुटू देखील शकतात. यामुळे मज्जासंस्थेवर व तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम होऊन झोपेची समस्या निर्माण होते.

विटामिन्स-

आपण निरोगी रहाण्यासाठी अनेक विटामिन्स घेतो पण आश्चर्याची बाब म्हणजे या विटामिन्स मुळे तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. स्लीप मेडीसिन या जर्नल मध्ये छापून आलेल्या एका संशोधनानूसार एक किंवा अधिक विटामिन घेतल्याने तुम्हाला झोपेची समस्या, झोपमोड होणे अथवा निद्रानाश होऊ शकतो. झोप येणे अथवा जाग येणे यावर आपल्या मज्जासंस्थेचे नियंत्रण असते.पण विटामिन घेतल्याने हे संतुलन बिघडते व झोपमोड होते.

तुमच्या झोपमोडीचे कारण वर दिलेल्या कारणांपैकी एखादे असेल तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या

स्मार्टफोनमुळं जागी राहत आहेत किशोरवयीन मुलं

किशोरवयीन मुलांना किमान दहा तासांची झोप आवश्यक आहे. पण, 50 टक्के मुलांना ती मिळत नाही असं एनएचएसनं म्हटलं आहे. खरंतर बेडरुममध्ये आराम करायला हवा पण त्या ठिकाणी लॅपटॉप, मोबाइल यांचं वास्तव्य असतं.

त्यामुळं किशोरवयीन मुलं रात्रभर जागतात. पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडं आता मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या उपकरणांतून परावर्तीत होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपण्याची इच्छा कमी होते आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर चॅट करत असतो तेव्हा आपला मेंदू सक्रिय होतो त्यामुळे देखील झोप उडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *