रानभाज्या महोत्सव, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार

ठाणे



ठाणे: रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी रानभाज्या महोत्सव जिल्हा परिषद ठाणे येथिल आवारात आयोजित करण्यात आले होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल याच्या हस्ते उद्घाटन व दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. रानभाज्या महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ येथिल ग्रामीण भागातील एकूण ४० स्टॉल लावण्यात आले आहे. या महोत्सवात पावसाळ्यातील औषधी व गुणकारी रानभाज्या उपलब्ध असून आघाडा, शेवळा, कुलूची भाजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा इतर सर्व रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध होते.



उमेदच्या महिलांना खुप शुभेच्छा. निसर्गाने आपल्याला जे दिलंय ते तुम्ही शहरी भागातील लोकांना देताय हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात तरुण लोकांमध्ये हार्ट ॲटॅकचे प्रमाण वाढत आहे. सर्वांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे कारण रोजच्या जेवणातील पोषण घटक कमी होत आहेत जावनशैली बदलत चाललेली आहे त्यामुळे प्रतिज्ञा करायला हवी की आठवड्यातून एक दिवस आपण रानभाज्या खायला हव्यात आणि आरोग्य सुधारण्यासाठी रानभाज्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपला उपक्रम महत्त्वाचं आहे असे प्रतिपादन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्रमात केले आहे.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश फडतरे कार्यक्रम येथे असे सांगितले की सांगितले की मानवाच्या रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी रानभाज्या पुर्ण वर्षभरात केवळ पावसाळ्याच्या १-२ महिन्यात उपलब्ध होतात. त्याचा पुरेपूर वापर करून आपल्या आहारातील पोषणमूल्य उंचाऊन आपल्याला जास्तीत जास्त लाभ घेता येईल यासाठी महत्त्वाचे आहे. मा. प्रकल्प संचालक यांनी महिलांना या व्यवसायात उतरून वेगळी ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले.

यावेळी मा. प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री. अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) श्री. प्रमोद काळे, महिला बालकल्याण विभाग प्रमुख श्री. संजय बागुल, मोठ्या संख्येने उपस्थित महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *