आरक्षणाचे जनक, लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त, भिवंडी महानगरपालिकेची मानवंदना

भिवंडी



भिवंडी : लोक कल्याणकारी, क्रांतीकारी राजे म्हणून ख्याती असणारे, सामाजिक एकता स्थापन करणारे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे परंतु मोफत अशी सुविधा निर्माण करणारे जीवंत व लोककल्याणकारी राजा जे भारताततील लोकशाहीचे ख-या अर्थाने आधारस्तंभ होते, अशा उच्चविद्याविभूषित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ऊर्फ यशवंतराव जयसिंगराव घाटगे कोल्हापूर संस्थान यांची जयंती आज भिवंडी महानगरपालिके मध्ये शासनाच्या आदेशान्वये व महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते मनपाच्या तळ मजल्या वरील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेने जयंती निमित्ताने उप-आयुक्त (मुख्यालय) दिपक पुजारी, उप- आयुक्त दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यांत आली.


छत्रपती शाहू महाराजांना कुस्तीची आवड असल्याने, १८९५ मध्ये मोतीबाग तालीम सुरु केली. त्यांनी त्यांच्या आयुष्यांत कला-क्रीडा, जलक्रांतीसाठी जल व्यवस्थापनेत धरण, तलावांची निर्मित करणे, बहुजनांना वेदोक्ताचा अधिकार मिळविण्यासाठी प्रखर आंदोलन केले, शुद्र-अतिशुद्रांच्या शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये उघडले, असे बहुजन उध्दारक, शिवरायांचा समर्थपणे वारसा चालवणारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यात छ.शाहू महाराजांनी उत्तमपणे मदत केली. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्याप्रती आदरयुक्त विधान केले होते की, एक वेळ मला विसरलात तरी चालेल, परंतू अस्पृशांना मदतीसाठी सदैव तत्पर असणा-या थोर अशा राजर्षी शाहू महाराजांना विसरु नका, उलट त्यांची जयंती सणासारखी साजरी करा असे त्यांनी शाहू महाराजांबद्दल गौरवपूर्ण शब्दांत उदगार काढले होते.
अशा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यास जयंतीनिमित्त महानगरपालिका अधिकारी व कर्मचा- यांनी मानवंदना दिली. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त (जनसंपर्क) प्रणाली घोंगे, सुनिल पाटील, नितीन पाटील, उद्यान अधिक्षक निलेश संख्ये, प्रभाग अधिकारी फैसल तातली, अग्निशमन अधिकारी राजेश पवार आणि मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचा-यांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यांत आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *