मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका शेअर ब्रोकिंग कंपनीच्या संचालकाला गुंतवणुकीवर किफायतशीर परताव्याच्या आश्वासनावर 52 गुंतवणूकदारांना 2.77 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरूवारी अटक केली आहे.
प्रशांत आंगणे असे आरोपी संचालकाचे नाव आहे. मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये आरोग्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद असल्यामुळे अखेर याप्रकरणी तपास आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर ब्रोकिंग कंपनी गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याच्या आमिषाने फसवणूक करत होती. कंपनीची माहीम धारावी भांडुप या परिसरात कार्यालय होती. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी याच भागातील रहिवाशांना मोठ्या संख्येने फसवल्याचे तपासात समोर आले.कंपनीने एक जाहिरात तयार केली होती.
या जाहिरातीत गुंतवणुकीवर भरगोस परताव्याचं आश्वासन दिले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीचा संचालक प्रशांत आंगणे सेमिनार घेत असत. अलीकडे, त्यांनी अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे ऑनलाईन सेमिनार आयोजित असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात जवळजवळ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचा पोलिसांना अंदाज आहे.या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.