भिवंडी | शहरात ऑर्केस्टाबारच्या नावाखाली सपना बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच नारपोली पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकून १० बारबालासह हॉटेल मॅनेजर, वेटर अश्या १३ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील दापोडे रोड असलेल्या सपना लेडीज बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरु असलेल्या डान्स बारमध्ये उशिरापर्यत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर बारबाला अश्लील हावभाव करीत असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ४ एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान बारवर छापा टाकला असता, बारमध्ये बसलेल्या ग्राहकांसमोर तोकड्या कपड्यांवर बारबाला अश्लील हावभाव करीत असल्याचे आढळून आले.त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत बार मॅनेजर अविनाश गोपीनाथ सूर्यवंशी (२५), वेटर शंभुनाथ गिरी ( ४९), पवित्र भास्कर भुयान ( ४५) यांच्यासह १० बारबालांना ताब्यात घेऊन शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलीस हवालदार भरत नवले यांच्या तकरीवरून नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.बिरो रिपोट अनिल गजरे भिवंडी.
