पुढील दोन महिन्यांत घरकुल आवास योजना व स्वच्छ भारत मिशन ची कामे पुर्ण झाली पाहिजे – सीईओ

ठाणे

पंचायत समिती शहापूर येथे आढावा बैठक

शेतकरी भवन, पंचायत समिती शहापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत विविध योजनांची सध्यस्थिती व कार्य पद्धती बाबत चर्चा करण्यात आली. दि. ०६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आढावा बैठक सुरू झाली यावेळी जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधान मंत्री आवास योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, कर वसुली, पंधरावा वित्त आयोग संदर्भात आढावा घेण्यात आले.


पुढील २ महिन्यात जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, अपूर्ण घरकुल पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहून काम करा. दोन महिन्यांत दिलेली कामे पुर्ण झाली नाही तर कारवाई करण्यात येईल असे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले. तसेच मोखावणे येथिल ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकळे यांनी समन्वय साधून प्रयत्नपूर्वक खाजगी जागेत १२ घरासाठी जमीन उपलब्ध करून दिली आहे. दिनेश यांचे कौतुक करुन त्यांच्याकडून आदर्श घेत कामे उत्तमरित्या पार पाडावीत असे सांगितले.‌

खर्डी ग्रामपंचायत येथिल जल जीवन मिशन योजनेच्या कामाची पाहणी करण्यात आली तसेच काम जलदगतीने करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.‌ खर्डी ग्रामपंचायत अंतर्गत १५ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा वाटपाची सनद मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग श्री. अर्जून गोळे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर श्री. भास्कर रेंगडे तसेच सर्व पंचायत समितीचे विभाग प्रमुख, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक उपस्थित होते. कामातील गती वाढविण्यासाठी आढावा बैठक महत्त्वाची ठरतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *