अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये – पालिका आयुक्त प्रशासकाचे आवाहन.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका कार्यक्षेत्रात शासनाची परवानगी नसताना अनेक ठिकाणी अनाधिकृत शाळा सुरु आहेत.
त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या अनाधिकृत शाळांबाबतीत पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यासह
सर्व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शासन आदेशानुसार कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न केल्याने महापालिका प्रशासन व शालेय विद्यार्थी चे मोठे नुकसान होणार आहे.याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांना माहिती मिळताच त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे
पालकांना आवाहन केले आहे की, पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचा (मुलांना) प्रवेश घेऊ नये. तसेच ज्या पालकांची मुले या शासन मान्यता नसलेल्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अन्य शासनमान्य शाळेत करावेत. महापालिका क्षेत्रातील शाळांच्या शाळा व्यवस्थापनाने परवानगी नसलेल्या शाळा त्वरीत बंद कराव्यात, अन्यथा त्याच्यावर बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दंडात्मक तसेच कायदेशीर, प्रशासकीय कारवाई केली जाईल असा कडक इशारा पालिका आय़ुक्त वैद्य यांनी दिला आहे.त्यामुळे अनाधिकृत शाळा चालविणाऱ्या चालकां मध्ये खळबळ माजली आहे.
भिवंडी महा पालिकेतर्फे पुढील शाळा या अनधिकृत शाळा म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.
1) झम झम मकतब आणि शाळा भिवंडी ठाणे रावजीनगर, नवी वस्ती कल्याण रोड, भिवंडी २). डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंग्रजी शाळा रावजी नगर, नवी वस्ती कल्याण रोड, भिवंडी, 3). रॉयल इग्रजी शाळा, गुलाम नबी पटेल कम्पौंड, सिराज मंजिल, अमिन हॉस्पीटल, धामणकर नाका, भिवडी, 4) नोबेल इंग्रजी शाळा अवचित पाडा, भिवडी खान कम्पाऊंड, गैबीनगर, ५). अल रजा उर्दू प्राथमिक शाळा, राजधानी रोड, खान कम्पाऊंड गैबीनगर, भिवडी,६). मराठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा पाईपलाईन शेजारी टेमघर, भिवडी ७). इंग्लीश प्राथमिक शाळा टेमघर पाडा, भादवड, ८). दि लर्नींग प्राथमिक शाळा,टेमघर पाडा- भादवड, ९). एकता इंग्रजी पब्लीक शाळा 100 फुट रोड, फातमानगर, नागाव गायत्रीनगर, भिवडी, 10.) एकता उर्दू पब्लीक शाळा 100 फुट रोड, फातमानगर, नागांव गायत्रीनगर, भिवडी, ११) ए.आर.रेहमान उर्दु प्राथमिक शाळा, फातमा नगर, नागांव, १२). झवेरीया उर्दु प्राथमिक शाळा, अपना हॉस्पीटल मागे गैबीनगर, भिवडी,13). विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा नदीवस्ती कल्याण रोड, 14). सरस्वती इंग्रजी शाळा, नवी वस्ती, गौतम कपाउंड कल्याण रोड, भिवडी,15). अल हिदाया पब्लीक प्राथमिक शाळा, हुदया मज्जिद पटेल नगर, बाला कम्पाउंड, भिवडी, 16) तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा, निशाद होटेल, चिहीशाह दर्गा जवळ जैतनुपुरा, भिवडी,17). इकरा इस्लामिक शाळा आणि मकतब, ताहेरा टॉवर शेजारी मेट्रो होटेल नदिनाका, भिवंडी,18). कैंसर बेगम इंग्रजी शाळा सागर प्लाझा हाटेल समोर नागाव भिवंडी १९) अल फलक मकतब आणि इंग्रजी प्राथमिक शाळा साईल होटेल जवळ, खजुरपुरा, परशुराम टावरे स्टेडीयम, 20). फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा, दर्गाह रोड, भिवडी दिवानशाह दर्गा रोड, भिवडी, 21). गितांजली इंग्रजी माध्यमिक शाळा, पहमानगर, व-हाळ देवी रोड, भिवंडी या शाळांना पालिकेने कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नाही त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थी यांनी प्रवेश घेवू नये. जर कोणी या शाळेत प्रवेश घेतला असेल तर त्यांनी सदर शाळेतील प्रवेश रद्द करून अधिकृत मान्यता प्राप्त शाळेत प्रवेश घ्यावा, आपल्या पाल्याचे नुकसान होऊ नये याची सर्व खबरदारी पालकांनी घ्यावी, असे आवाहन पालिका आय़ुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.