भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडीत भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी दीड कोटी रुपये घेऊन परस्पर दुसऱ्या सोबत भागीदार करार करून व्यावसायिकाची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे. ब्राईट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक रणमल जुगराज विरवाडीयार,जितेंद्र रणमल विरवाडीयार,रोहीत रणमल विरवाडीयार,सौ.सपना जितेंद्र विरवाडीयार या मुंबई येथे राहणारे यांच्या मालकीची अंजुरफाटा येथे मधुसुदन कंपाउंड व श्रीराम कंपाउंड या नावाने जमीन आहे.या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभा करण्यासाठी बांधकाम व्यावसायीकाची व आर्थिक गुंतवणूक करणाऱ्याची गरज असल्याचे भासवुन तसेच श्रीराम नगर येथील जागा विकसित करुन मधुसुदन कंपाउंडमधील गाळे विक्री करणार असल्याचे अमिष दाखवुन मुंबई येथे राहणारे प्रकाश विमलचंद यांना गळ घालत 50 टक्के भागीदारी व राजेश सुरजमल शहा यांना 22.50 टक्के इतक्या भागीदारीने भागीदारी पत्र बनवून सोबत घेतले.त्यानुसार प्रकाश विमलचंद यांनी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर ब्राईट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चार ही मालकांनी प्रकाश विमलचंद व राजेश शहा यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना अगर नोटीस न देता नवीन भागीदार म्हणून आपल्या सुनेचे नाव समोर आणून नावे भागीदारपत्र बनविले.तर मधुसुदन कंपाउंड मधील गाळे व जमीन कोणत्याही अधिकारा शिवाय माझी कोणतीही परवानगी अथवा संमती न घेता विक्री करून नऊ कोटी रुपयांचा नफा कमाई करून आर्थिक फसवणुक केली.या प्रकरणी प्रकाश विमलचंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी ब्राईट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक रणमल जुगराज विरवाडीयार,जितेंद्र रणमल विरवाडीयार,रोहीत रणमल विरवाडीयार,सौ.सपना जितेंद्र विरवाडीयार यांच्या विरोधात फसवणुकी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सपोनि विजय कोळी करीत आहेत.