राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

ठाणे


ठाणे: ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि. ३ मार्च २०२४ रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापुर, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. सदर मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील ५ वर्षा पर्यंतच्या एकुण १ लाख ३६ हजार ७५६ बालकांना तसेच बदलापुर व अंबरनाथ क्षेत्रातील एकुण ६८ हजार ५९५ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेत ग्रामीण व बदलापुर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एकुण १ हजार ८६८ बुथवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

यासाठी ५ हजार ७७८ कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. तसेच दि. ३/०३/२०२४ रोजी बुथवर लसीकरण केल्यानंतर राहिलेल्या बालकांना कर्मचारी घरोघरी जाऊन पुढील ३ ते ५ दिवसात पोलिओचे लसीकरण करणार आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सदर मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त लाभार्थिनी लसीकरण करुन घेणे बाबत आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *