भिवंडी : वाढते शहरीकरण यामुळे पालिकेचा सर्वच कामांवर वाढ झालेली आहे झालेली आहे.त्यात शहराचा साफसफाईचा कणा असलेला भाग म्हणजे आरोग्य सफाई कामगार होय. मुख्यत्वे शौचालय विभागात काम करणारे कर्मचारी त्यांचे काम अतिशय खडतर आहे त्यांच्या जीवाची व आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची मूलभूत प्राथमिक जबाबदारी आहे. अशा शौचालय सफाई कामगारांच जीवन खरोखरच खडतर आहे त्यांच्या जीवाची काळजी घेणे त्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना करणे त्यांच्या मनोरंजन करणे हे देखील आवश्यक असल्यास आवश्यक आहे असे प्रतिपादन पालिका आयुक्त आहे वैद्य यांनी केले आहे.
आरोग्य शौचालय विभागात काम करणारे कर्मचारी यांच्याकरता पालिकेने अंधे जहा के अंधे रास्ते या नाटकाचा विशेष प्रयोगाच्या आयोजन आरोग्य हजारे समाज हॉल सभागृहात करण्यात आले होते त्यावेळेला पालिका आयुक्त अजय वैद्य हे कर्मचारी वर्ग यांना संबोधित करत होते. यावेळेला पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, आरोग्य उपायुक्त दीपक झिंजाड , मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुलवी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले , उद्यान विभाग प्रमुख निलेश संखे अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालिका कर्मचारी वर्गाकरिता मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. पालिकेच्या गेल्या अनेक वर्षात अशा प्रकारच्या नाटकाचा प्रयोग झालेला नाही ही बाब आयुक्त यांनी खास नमूद केली. पालिका आयुक्त म्हणून अजय वैद्य यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामगारांच्या कलागुणांना वाव देणे, कामापासून तणाव मुक्त ठेवणे, व्यसनमुक्ती अभियान राबवणे इत्यादी उपक्रम पालिकेने सुरू केलेले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पालिका आरोग्य कामगार कर्मचारी यांच्या करता एका नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. अस्तित्व या संस्थेच्या वतीने अंधे जहा के अंधे रास्ते या या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
सत्य घटनेवर आधारित दोन अंकी नाटक हे शौचालय विभागातील काम करणारे कर्मचारी यांच्या समस्या अधोरेखित करण्यात आल्या. नाटकाचे सादरीकरण अत्यंत परिणामकारक व वास्तववादी चित्रण स्वरूपात झाले होते.
मेन होल मध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या समस्या आणि त्यांच्याशी समाज कशाप्रकारे वागतो. शौचालय विभागात काम करणारे व त्यांना काम देणारे ठेकेदार व अन्य समाजातील घटक कसे वागतात याच वास्तववादी चित्रण या नाटकात सादर आलं होतं.
या नाटकातून कामगार वर्गाला, शिक्षणानेच आपल आयुष्य सुधारू शकत, शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या नाटकाचे लेखन दिग्दर्शन उर्मी सावंत यांनी फार चांगल्या प्रकारे सांभाळले, नाटक यशस्वी करण्याकरता अस्तित्व चे अस्तित्व नाट्य संस्थेचे उर्मी उर्फ शिल्पा सावंत, विनायक साळुंखे यांच्यासह पन्नास कालाकारांसह समर्थपणे परिणामकारक नाटक नाटक सादरीकरण करण्यात आले.
