भिवंडी : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमुळे भिवंडी शहराला फायदा आहे. भिवंडी सारखे शहर हे ठाणे आणि मुंबई यांच्या जवळ असल्यामुळे या शहराचा विकास फार मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे पण तसे झाल्याचे दिसून येत नाही येत नाही. शहरात फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे, झोपडपट्टी भागाचा चांगल्या प्रकारे विकास करणे आवश्यक आहे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना चांगल्या प्रकारे शहरात राबवली तर भिवंडी शहराचा नक्कीच कायापालट होईल, असे उद्गार पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी काढले.भिवंडी निजामपूर शहर महानगर क्षेत्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणे बाबत एका महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यावतीने एका कार्यशाळेचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले होते त्यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुंबई महानगरपालिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उप मुख्य अभियंता नितीन पवार, उपजिल्हाधिकारी वैशाली ठाकूर, राजकुमार पवार कार्यकारी अभियंता, स्मिता मोहिते तहसीलदार मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , गजानन भोईर सहकारी अधिकारी , निलेश सावंत वास्तु विशारद ठाणे, पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, प्रारूप विकास आराखडा नगररचनाकार विशेष घटक स्मिता कलकुटकी, सहाय्यक संचालक नगर रचना अनिल एलमाने मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पालिका आयुक्त पुढे म्हणाले की, मुंबई, ठाणे शहराच्या जवळ असल्यामुळे तसेच मुख्य प्रमुख महामार्गाचे रस्त्याचे जाळे, असल्यामुळे वाहतूक सुविधा देखील चांगले आहेत त्यामुळे भिवंडी सारख्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसन केल्यास चांगले महत्त्व प्राप्त होऊ शकते, भिवंडी सारख्या शहरात फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने भिवंडी शहराचा विकास होण्याकरता झोपडपट्टी पुनर्विसन पुनर्विसन पुनर्वसन योजना या शहरात अधिक प्रभावीपणे राबवून राबवणे आवश्यक आहे त्याकरता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे त्याचा फायदा शासनाला, महानगरपालिकेला तसेच येथील नागरिकांना देखील होणार आहे. झोपडपट्टी विकास करताना ज्या जागा मोकळ्या होतील त्या ठिकाणी शहरातील वेगवेगळ्या विकास काम करण्याकरता जागा उपलब्ध होतील आणि शहरातील चांगल्या प्रकारे सुनियोजित योजना बद्ध विकास करणे शक्य होईल असे देखील पालिका आयुक्त यांनी याप्रसंगी नमूद केले.
