जिल्हा परिषद ठाणे येथे नवीन मुख्यालय इमारतीची उभारणी

ठाणे

नवीन इमारतीसाठी प्रस्ताव व तांत्रिक मान्यतेस शासनाची मंजुरी- मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल


ठाणे:जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषद अंतर्गत होणारा कारभार सांभाळण्यासाठी ही वास्तू भक्कम असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद ठाणे येथील इमारत १९६५- ६६ साली बांधण्यात आली होती. मुख्य इमारत अतिधोकादायक असल्याने मार्च २०१९ रोजी इमारत पाडण्यात आली. याच ठिकाणी नवी प्रशासकीय इमारत उभी होणार आहे. मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री श्री.‌ देवेंद्र फडणवीस व मा. उप मुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या पुढाकाराने व सहकार्यने या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. जि. प. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्ययांनी देखील जिल्हा परिषदेची इमारत व्हावी यासाठी अथक प्रयत्न केल असून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे २०१९ मध्ये स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने नव्या इमारती संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला. या प्रस्तावाला शासकीय मान्यता मिळाली असून ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच ६२ कोटी ६४ लक्ष ६६ हजार १६३ रुपयांची तांत्रिक मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे.‌

मा. केंद्रीय राज्यमंत्री, पंचायत राज श्री. कपिल पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीचे प्रस्ताव व तांत्रिक मान्यता मंजूर केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री.‌ एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री श्री.‌ देवेंद्र फडणवीस, मा. उप मुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे आभार व्यक्त केले. तसेच मा. जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या विशेष प्रयत्नाने कामास गती मिळाली आहे असे प्रशासनाचे कौतुक केले.

नव्या इमारती मध्ये सर्व विभाग एकत्रित समन्वयाने काम करू शकणार आहेत. त्यामुळे कामकाज सुरळीत चालू राहण्यास मदत होईल.‌ ठाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीचे नवीनचे निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी दिली.


नव्या इमारतीची वैशिष्ट्य

– तळमजला, ३ मजली पार्किंग व ८ मजली इमारत असेल.

– २०, १७३.२७ चौरस, मीटर क्षेत्रफळ

– प्रवेशद्वार व स्वतंत्र कमान

– प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र फर्निचरची व्यवस्था

– विद्युतिकरणाची कामे

– अंतर्गत रस्ते

– सुशोभीकरणाची कामे

– इमारतीच्या सभोवताली संरक्षक भिंतीचे काम.

– इमारतीत ५६३ दुचाकी व ५७ चार चाकी वाहनासाठी स्वतंत्र पार्किंग

– ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था

– अग्निशामक यंत्रणेसाठी २,००,००० लिटरची पाण्याची टाकी.

– अस्तित्वात 54 गाळे धारकांसाठी इमारतीत विचार करण्यात आलेला आहे.

– सौर ऊर्जा नेट मीटर सिस्टिम

– परिसर विकसित करणे.

– अग्निशमन यंत्रणा सुविधा

– रेन वाँटर हार्वेस्टिंग

– स्ट्राँम वाँटर ड्रेन

– भुमिगत पाण्याची टाकी

– मलनिस्सारण प्रकल्प (STP)

– सदर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फ्लशिंग व बागकामासाठी पुनर्वापर करण्याची सोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *