ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये ग्रामीण भागातील स्वच्छतेचे काम करणारे सर्व सफाई कर्मचारी यांची तालुका स्तरावर कार्यशाळेत आयोजन करून सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला असून त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली आहे. शासकीय योजनांची माहिती या कार्यशाळेमध्ये देण्यात आले.

अंबरनाथ पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी येत उत्साह सफाई मित्र दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी संत गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन करून स्वच्छतेची शपथ ग्रहण करण्यात आले.
यावेळी स्वच्छतेच्या क्षेत्रात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे व आपले ठाणे जिल्हा कचरा मुक्त करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक श्री. दादाभाऊ गुंजाळ यांनी केले.
*ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावर ५३० सफाई कर्मचाऱ्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले व त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.*