भिवंडी महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धा आयोजन

भिवंडी




भिवंडी:बुध्दीबळ खेळामुळे वैचारिक चालना मिळते. या खेळामुळे शिस्त व स्थिरता प्राप्त होते. विचार शक्ती गतीमान होते. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात त्यावर मात करण्यासठी बुध्दीबळ खेळातील डावपेच आपल्या कामी येतात. या खेळामुळे आपण जीवनाकडे सकारात्मकतेने बघु शकतो. भारतासारख्या देशाने अनेक बुध्दीबळपट्टू तयार केले आहेत. बुध्दीबळ क्रीडा पट्ट् यांनी क्षेत्रात आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव पुढे नेले आहे. याच प्रमाणे या बुध्दीबळ क्रीडा प्रकारातून भिवंडी शहरातून पुढे येऊन देश पातळीवर नावलौकिक प्राप्त करावे असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी केले. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांच्या सहयोगाने भिवंडी महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धाचे आयोजन स्व. राजय्या गाजेंगी सभागृह येथे करण्यात आले होते त्या स्पर्धेचे उद्घाटन करताना पालिका आयुक्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, क्रीडा विभागाच्या उपायुक्त प्रणाली घोंगे, क्रीडा अधिकारी शरद कलावंत, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, वरीष्ठ बुध्दीबळपट्ट् शशीकांत सोमण शालेय स्तरावरील बुध्दीबळपट्ट्, शिक्षक वर्ग उपस्थित होते. या प्रसंगी अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी देखील मनोगत व्यक्त केले. बुध्दीबळ खेळातून भिवंडी शहरातून पुढे नावलौकिक प्राप्त करावा, याला खेळ म्हणून विकसीत करा व खेळाडू भावनेने हार जीत याचा स्विकार करा.

पालिका आयुक्त यांनी व विठ्ठल डाके यांनी बुध्दीबळाचा एक डाव खेळून या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील 52 शाळा सहभागी झाल्या असून 338 खेळाडूनी यांनी भाग घेतला. या स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रम प्रत्येक प्राविण्य प्राप्त खेळाडूना महापालिकेतर्फे बक्षीस देऊन गैरविण्यात येणार आहे.

या प्रसंगी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी देखील खेळाडूना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तिवक उपायुक्त प्रणाली घोंगे यांनी केले तर क्रीडा अधिकारी शरद कलावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *