माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण पुरक सण व उत्सव साजरा करणे व पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करणे बाबत शासन निर्णय व मा. प्रशासक तथा आयुक्त सो. यांचे निर्देशानुसार दिनांक १३/०९/२०२३ रोजी महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग आयोजित शाडुच्या मातीपासून गणेश मुर्ती बनविण्याचे कार्यशाळेचे आयोजन मनपा शाळा क्र. ४५ भादवड येथे करून शाडुच्या मातीपासून गणेशमुर्ती बनवून पर्यावरण पुरक सण व उत्सव साजरे करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत सर्वांनी हरित शपथ घेतली. सदर कार्यशाळेमध्ये मनपा शाळेतील ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहपुर्ण सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमाकरीता पर्यावरण विभाग प्रमुख, श्री नितेश चौधरी, शिक्षण विभागाचे श्री. जितेंद्र हेडाऊ, शाळा क्र. ४५ भादवड श्री. धुमाळ सर, साहसी संस्थेचे श्रीम. पुनम नायर, पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे येथिल प्रशिक्षिका हजर होत्या. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. स्वाती भोईर मॅडम यांनी केले.
