ठाणे – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते म्हणाले की, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला. तरी कुठे काही हलायला तयार नाही
ठाण्यात शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एक महिला रोशनी शिंदे यांना मारहाण केली होती. यावरून राजकारण तापले आहे. आता उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दात हल्लाबोल केला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय, अशी थेट टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केल
ठाण्यातील गुंडगिरी आम्ही उखडून काढू – ठाकरे पुढे म्हणाले की, हे सरकारच नपुसंक आहे असे न्यायालयाने सांगितले, पण ते
खरेच दिसत आहे. शिवसेनेचे ठाणे सुशिक्षित आहे. आता मात्र गुंडाचे ठाणे असे समिकरण झाले आहे. महिला गुंडगिरी करायला
लागल्या आहेत, मग ठाण्याचे काय होणार असा प्रश्न आहे. ठाण्यातील गुंडगिरी आम्ही उखडून काढू, असा इशारा ठाकरेंनी दिला.
आयुक्त जगेवर नाही. ज्या गुंड महिलांनी हल्ला केला. त्यांची नावे दिली आहेत. मात्र उपाययोजना होत नाही. फडतूस गृहमंत्री
राज्याला लाभला आहे, असे ते म्हणाले.
बिनकामाचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांना निलंबित किवा बदली करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. ते FIR घ्यायला तयार
नाहीत. उद्या दुपारी शिवाजी मैदान ते ठाणे पोलीस आयुक्त मोर्चा काढणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. ठाणे पोलीस आयुक्तालयाला
टाळे ठोकणार अशी घोषणाही त्यांनी केली. उद्याच्या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असे त्यांनी जाहीर केले. आजचा ठाकरे
यांचा अविर्भाव अत्यंत कडक दिसत होता.
फडणविसांचे प्रत्युत्तर – दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना चोख
प्रत्युत्तरही दिले आहे. खरा फडतूस कोण आहे, ते जनतेला चांगलेच माहीत आहे, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा संयम
सुटलेला आहे, त्यांनी संयमाने बोलावे असा सल्लाही फडणवीस यांनी ठाकरे यांना दिला. तसेच ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांना
तुरुंगात टाकल्याशिवाय आपण राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. ठाकरे यांच्यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन आपल्याला
बोलता येईल. मात्र आपण तसे बोलणार नाही, आपली तशी संस्कृती नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लावल